उत्पत्ती ३५:१०-११
१०
परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले.
११
परमेश्वर त्याला म्हणाले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे; फलद्रूप हो आणि तुझी संख्या अनेक पटीने वाढो. तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून मी तुझी वृद्धी करेन. पुष्कळ राजे तुझ्या वंशजातून उदय पावतील.
Settings