Skip to content
उत्पत्ती २९:१८-३०

उत्पत्ती २९:१८-३०

१८
याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.”
१९
लाबान म्हणाला, “परकीय मनुष्याला तिला देण्यापेक्षा ती तुला देणेच उत्तम आहे. माझ्यासोबत इथे राहा.”
२०
याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली.
२१
तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.”
२२
तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.
२३
परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली.
२४
आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली.
२५
पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?”
२६
लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही.
२७
लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.”
२८
याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली.
२९
लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली.
३०
मग याकोबाने राहेलचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. तो तिच्यावर लेआपेक्षा अधिक प्रेम करी आणि तिच्यासाठी आणखी सात वर्षे तिथे राहून त्याने काम केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options