Skip to content
उत्पत्ती १०:२१-३१

उत्पत्ती १०:२१-३१

२१
याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
२२
शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
२३
अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
२४
अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला.
२५
एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.
२६
योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
२७
हदोराम, ऊजाल, दिक्लाह,
२८
ओबाल, अबीमाएल, शबा,
२९
ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.
३०
(ते मेशापासून सफार या पूर्वेकडील डोंगरापर्यंतच्या भागात राहत होते.)
३१
कुळे, भाषा, देश आणि राष्ट्रे अशाप्रकारे गोत्रानुसार विभागणी केलेले शेमचे हे वंशज होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options