Skip to content
एज्रा ८:२५-३०

एज्रा ८:२५-३०

२५
राजा, त्याचे कारभारी मंडळ, पुढारी आणि इस्राएली लोक यांनी परमेश्वराच्या मंदिरासाठी अर्पण केलेले सोने, चांदी, सोन्याची पात्रे व इतर वस्तू मोजून दिले व ते यरुशलेमला नेण्याची जबाबदारी मी त्या बारा पुढार्‍यांवर टाकली.
२६
याप्रकारे मी त्यांचे वजन केले, 650 तालंत चांदी, 100 तालंत चांदीची पात्रे, 100 तालंत सोने,
२७
1,000 दारिक वजनाचे वीस सोन्याचे कटोरे व उज्वल कास्याचे, सोन्याइतकेच मोलाचे दोन सुंदर कटोरेही होते.
२८
मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही, तसेच याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराला वाहिलेली स्वैच्छिक अर्पणे म्हणजे सोने चांदी व सोन्याचांदीची पात्रे याहवेह परमेश्वराला समर्पित केलेली आहेत.
२९
हे सर्व साठे याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवण्याकरिता तोलून यरुशलेमात नेतृत्व करीत असलेले याजक, लेवी व इस्राएलचे वडीलजन यांच्या स्वाधीन करण्याआधी यांचे काळजीपूर्वकरित्या रक्षण करा.”
३०
तेव्हा याजक आणि लेवींनी तोलून दिलेले चांदी, सोने व पवित्र पात्रे यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options