Skip to content
एज्रा ७:२३-२८

एज्रा ७:२३-२८

२३
स्वर्गातील परमेश्वराच्या आज्ञेनुसार लागेल ते सर्व काळजीपूर्वकपणे पुरवावे. कारण स्वर्गातील परमेश्वराचा क्रोध राजावर आणि त्याच्या पुत्रांवर येण्याचा धोका आपण का पत्करावा?
२४
मी अशीही आज्ञा देतो की याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरात काम करणारे आणि मंदिरातील इतर कामगार यांच्यापासून कुठलाही कर, जकात वा चुंगी घेण्याचा तुला अधिकार नाही.
२५
आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे.
२६
तुमच्या परमेश्वराची आज्ञा न मानणार्‍यांना आणि राजांचे नियम मोडणार्‍यांना ताबडतोब मृत्यू, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती, किंवा तुरुंगवास यापैकी कोणतीही शिक्षा द्यावी.
२७
तेव्हा एज्रा म्हणाला, “याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती असो! कारण त्यांनी राजाच्या अंतःकरणात यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरास याप्रकारे सन्मान देण्याचे सुचविले,
२८
आणि त्यांनी राजासमोर व त्याच्या सात जणांच्या सल्लागार मंडळासमोर व सरदारांसमोर माझ्यावर मेहेरबानी केली. याहवेह माझ्या परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त माझ्यावर असल्यामुळेच मी धाडस करून काही इस्राएली पुढार्‍यांना मजबरोबर यरुशलेमला येण्यासाठी जमा केले.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options