एज्रा ७:१४-२१
१४
राजा आणि त्याचे सातजणांचे सल्लागार मंडळ तुला सूचना देत आहोत की, तुझ्याजवळ असलेल्या परमेश्वराच्या नियमानुसार यहूदीया व यरुशलेमबद्दल समाचार घेण्यासाठी तुला पाठविण्यात येते.
१५
शिवाय, राजा आणि त्याच्या सल्लागारांनी यरुशलेममध्ये ज्यांचे वास्तव्य आहे, त्या इस्राएलाच्या परमेश्वराला दिलेले सोने-चांदी तू बरोबर घेऊन जा.
१६
सर्व बाबेल प्रांतामध्ये तू गोळा केलेले सोने व चांदी, तसेच यरुशलेममधील आपल्या यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरासाठी इस्राएली लोक व त्यांच्या याजकांनी स्वखुशीने दिलेली अर्पणेही बरोबर घेऊन जावी.
१७
या पैशाचा उपयोग बैल, मेंढे, कोकरे, अन्न व पेय विकत घेण्यासाठी करून यरुशलेम येथील तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या वेदीवर या सर्वांचे अर्पण करावे.
१८
उरलेली रक्कम तू आणि तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल त्याप्रकारे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे खर्च करावी.
१९
तुझ्याबरोबर सोन्याची पात्रे व इतर वस्तूही आम्ही देत आहोत. ही यरुशलेमातील तुमच्या परमेश्वराच्या उपासनेसाठी आहेत.
२०
मंदिराच्या बांधकामाला अथवा तशाच प्रकारच्या कामासाठी तुम्हाला पैसा कमी पडला तर राजकीय खजिन्यातून निधी मागून घे.
२१
आता, मी राजा अर्तहशश्त, हा हुकूमनामा फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतातील सर्व खजिनदारांकडे पाठवित आहे. स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक व याजक एज्रा जी विनंती करेल व जे तुमच्याकडे मागेल ते त्याला द्यावे—
Settings