Skip to content
एज्रा ६:१६-२२

समर्पण आणि वल्हांडणाचा उत्सव

एज्रा ६:१६-२२
१६
याजकांनी, लेव्यांनी व सर्व इस्राएली लोकांनी अत्यंत हर्षाने मंदिराचा समर्पणविधी साजरा केला.
१७
या समर्पणविधीमध्ये शंभर बैल, दोनशे मेंढे आणि चारशे नरकोकरे अर्पण केली गेली, आणि इस्राएलांच्या बारा वंशासाठी बारा बोकडे पापार्पण म्हणून बळी दिले गेले.
१८
मग त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे यरुशलेममध्ये परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपआपल्या विभागांसाठी याजक आणि लेवींचीही नियुक्ती केली.
१९
वल्हांडण सण पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी साजरा करण्यात आला.
२०
तोपर्यंत याजक आणि लेवी यांनी विधीनियमाप्रमाणे स्वतःला शुद्ध करून घेतले होते. लेव्यांनी वल्हांडण सणाच्या अर्पणासाठी बंदिवासातून परत आलेल्या लोकांसाठी आणि याजकांसाठी व स्वतःसाठी वल्हांडणाची मेंढरे वधली.
२१
बंदिवासातून परत आलेल्या यहूदी आणि यहूदीयात वस्ती करून राहिलेले इस्राएली लोक मूर्तिपूजक परकीय लोकांच्या अशुद्ध चालीरीतींना सोडून, याहवेह परमेश्वराच्या भक्तीमध्ये सामील झाले.
२२
बेखमीर भाकरीचा सण सात दिवस हर्षभराने पाळण्यात आला. सर्व देशभर आनंदोत्सव होता, कारण याहवेहने अश्शूरच्या राजाला इस्राएलाशी कनवाळूपणे वागण्यास आणि इस्राएलाच्या परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामामध्ये मदत करण्यास प्रवृत्त केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options