मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल ६:२-७

इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध भविष्यवाणी

यहेज्केल ६:२-७
“हे मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे आपले मुख कर; आणि त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग
आणि सांग: ‘अहो इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्ही सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह पर्वतांना व डोंगरांना, झर्‍यांना व दर्‍यांना असे म्हणतात: मी तुमच्याविरुद्ध तलवार आणेन, आणि मी तुमची उंचावरील पूजास्थाने नष्ट करेन.
तुमच्या वेद्या फोडल्या जातील आणि तुमच्या धुपांच्या वेद्यांचा चुराडा करण्यात येईल; आणि तुमच्या मूर्तींपुढे तुमच्या लोकांना मी जिवे मारीन.
इस्राएली लोकांची प्रेते मी त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन आणि तुमची हाडे मी तुमच्या वेद्यांपुढे पसरवून टाकीन.
तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील.
तुमचे लोक तुमच्यामध्ये मारून पाडले जाईल आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options