यहेज्केल ४६:१-८
१
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: आतील अंगणाचे पूर्वेकडील द्वार कार्याच्या सर्व सहा दिवसा दरम्यान बंद असावे, परंतु शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी ते उघडे असावे.
२
राजपुत्राने बाहेरून द्वाराच्या देवडीकडून जाणार्या मार्गाने प्रवेश करावा आणि चौकीकडे उभे राहावे. याजकांनी राजपुत्राच्या होमार्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञ करावा. त्याने द्वाराच्या उंबरठ्यावर उपासना करीत नमन करावे आणि त्यानंतर बाहेर जावे, परंतु संध्याकाळपर्यंत द्वार बंद करू नये.
३
शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी.
४
शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे.
५
एका एडक्यासह दिलेले अन्नार्पण एक एफाह असावे आणि कोकर्याबरोबरचे धान्य त्याच्या आवडीनुसार एका एफाहसाठी एक हीन जैतून तेलाबरोबर द्यावे.
६
अमावस्येच्या दिवशी त्याने एक गोर्हा, सहा कोकरे आणि एक एडका हे द्यावे, ते सर्व निर्दोष असावे.
७
त्याने एका गोर्ह्यामागे एक एफाह व एका एडक्यामागे एक एफाह असे धान्यार्पण आणावे, आणि कोकर्याबरोबर आपल्या आवडीनुसार एक एफाह एक हीन तेलाबरोबर आणावे.
८
जेव्हा राजपुत्र प्रवेश करतो, त्याने द्वाराच्या देवडीकडील मार्गाने जावे आणि त्याच मार्गाने त्याने परत यावे.
Settings