Skip to content
यहेज्केल ४६:१

यहेज्केल ४६:१

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: आतील अंगणाचे पूर्वेकडील द्वार कार्याच्या सर्व सहा दिवसा दरम्यान बंद असावे, परंतु शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी ते उघडे असावे.
राजपुत्राने बाहेरून द्वाराच्या देवडीकडून जाणार्‍या मार्गाने प्रवेश करावा आणि चौकीकडे उभे राहावे. याजकांनी राजपुत्राच्या होमार्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञ करावा. त्याने द्वाराच्या उंबरठ्यावर उपासना करीत नमन करावे आणि त्यानंतर बाहेर जावे, परंतु संध्याकाळपर्यंत द्वार बंद करू नये.
शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी.
शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options