यहेज्केल ४५:१८-१९
१८
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक निर्दोष गोर्हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे.
१९
याजकाने पापार्पणातील काही रक्त घेऊन मंदिराच्या द्वार पट्टीवर, वेदीच्या वरील बैठकीच्या चार कोपर्यांना आणि आतील अंगणाच्या द्वार पाट्यांवर लावावे.