Skip to content
यहेज्केल ४३:२०-२७

यहेज्केल ४३:२०-२७

२०
तू त्याचे काही रक्त घेऊन वेदीच्या चार शिंगांना आणि वरील बैठकीच्या चारही कोपर्‍यांना आणि काठाला सर्वत्र लावावे आणि याप्रकारे वेदीला शुद्ध करून त्यासाठी प्रायश्चित कर.
२१
पापार्पणासाठी तू गोर्‍हा घ्यावा आणि पवित्रस्थानाबाहेर मंदिराच्या नेमलेल्या ठिकाणी तो जाळून टाकावा.
२२
“दुसर्‍या दिवशी पापार्पणासाठी निर्दोष बोकड घ्यावा आणि वेदी शुद्ध करावी, ज्याप्रकारे गोर्‍ह्याद्वारे शुद्ध केली होती.
२३
ती शुद्ध केल्यानंतर, एक गोर्‍हा व मेंढरातील एका मेंढ्याचे अर्पण करावे, ते दोन्ही निर्दोष असावेत.
२४
त्यांना तू याहवेहसमोर अर्पण करावे आणि याजकांनी त्यांच्यावर मीठ टाकावे आणि होमार्पण म्हणून याहवेहसमोर अर्पण करावे.
२५
“सात दिवस प्रतिदिनी तू एक बोकड पापार्पण म्हणून अर्पण करावा; एक गोर्‍हा व मेंढरातील एक मेंढा आणावा, ते दोन्ही निर्दोष असावेत.
२६
सात दिवस त्यांनी वेदीसाठी प्रायश्चित करून ती शुद्ध करावी; याप्रकारे ते वेदीचे समर्पण करतील.
२७
हे दिवस समाप्त झाल्यानंतर, आठव्या दिवसापासून पुढे, याजकांनी तुमची होमार्पणे व शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करावी. तेव्हा मी तुमचा स्वीकार करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options