यहेज्केल ४३:१३-१७
१३
“वेदीच्या लांबीचे हाताने माप याप्रकारे आहेत, म्हणजेच एक हात आणि चार बोटे: त्याच्या तळभागाचे माप एक हात खोल आणि एक हात रुंद होती, त्याचा कड व काठ याचे माप एक वीत होते आणि ही वेदीची उंची होती:
१४
भूमीवरील तळभागापासून वेदीच्या सभोवतालच्या खालच्या बैठकीपर्यंतची उंची दोन हात आणि बैठक एक हात रुंद आहे. या खालच्या बैठकीपासून वरील बैठकीपर्यंत जे वेदीसभोवती जाते ती चार हात उंच आणि ती सुद्धा एक हात रुंद आहे.
१५
त्याच्यावरती, वेदीचा अग्निकुंड चार हात उंच, आणि वेदीच्या अग्निकुंडाला जोडून चार शिंगे वर निघाली होती.
१६
वेदीचा अग्निकुंड चौरस असून तो बारा हात लांब आणि बारा हात रुंद आहे.
१७
वरील बैठक सुद्धा चौरस असून ती चौदा हात लांब आणि चौदा हात रुंद आहे. वेदीच्या चहूकडील तळभाग एक हात व त्याचा काठ अर्धा हात आहे. वेदीच्या पायर्या पूर्वेकडे आहेत.”
Settings