यहेज्केल ४३:१८-२२
१८
तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे:
१९
सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
२०
तू त्याचे काही रक्त घेऊन वेदीच्या चार शिंगांना आणि वरील बैठकीच्या चारही कोपर्यांना आणि काठाला सर्वत्र लावावे आणि याप्रकारे वेदीला शुद्ध करून त्यासाठी प्रायश्चित कर.
२१
पापार्पणासाठी तू गोर्हा घ्यावा आणि पवित्रस्थानाबाहेर मंदिराच्या नेमलेल्या ठिकाणी तो जाळून टाकावा.
२२
“दुसर्या दिवशी पापार्पणासाठी निर्दोष बोकड घ्यावा आणि वेदी शुद्ध करावी, ज्याप्रकारे गोर्ह्याद्वारे शुद्ध केली होती.
Settings