Skip to content
यहेज्केल २९:१-१६

यहेज्केल २९:१-१६

दहाव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहकडे आपले तोंड कर आणि त्याच्या व सर्व इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी कर.
त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे, तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो. तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे; तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.”
मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझ्या प्रवाहातील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील असे मी करेन. मी तुला तुझ्या प्रवाहातून ओढून बाहेर काढेन आणि त्यातील सर्व मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.
मी तुला व तुझ्या प्रवाहातील सर्व माशांना वाळवंटात सोडून देईन. तू मोकळ्या मैदानात पडशील आणि तुला ना कोणी जवळ करणार ना उचलणार. पृथ्वीवरील प्राणी व आकाशातील पक्ष्यांसाठी तू खाद्य होशील.
तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू इस्राएल लोकांसाठी बोरूच्या काठीप्रमाणे होतास.
जेव्हा त्यांनी त्यांच्या हातांनी तुला पकडले, तू त्यांना खरडले व त्यांचे खांदे मोडले; जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तेव्हा तू मोडलास व त्यांच्या कंबरा खचविल्या.
“ ‘यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध तलवार आणेन, मनुष्य व जनावरे या दोघांनाही मारून टाकीन.
इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू म्हणालास, “नाईल नदी माझी आहे; मी ती निर्माण केली,”
१०
म्हणून मी तुझ्याविरुद्ध आणि तुझ्या प्रवाहांच्या विरुद्ध आहे आणि मिग्दोलपासून असवानपर्यंत, अगदी कूशच्या सीमेपर्यंत मी इजिप्त देश ओसाड व वैराण करेन.
११
ना कोणी मनुष्य ना पशू त्यामधून जाईल; चाळीस वर्षे तिथे कोणी वस्ती करणार नाही.
१२
उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन.
१३
“ ‘तरीही, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: चाळीस वर्षे संपल्यावर जिथे ते विखुरले गेले त्या राष्ट्रांमधून इजिप्तच्या लोकांना मी एकवट करेन.
१४
बंदिवासातून मी त्यांना इजिप्तच्या पथरोस भागात, त्यांच्या पूर्वजांचा देश पत्रोसला परत आणेन, तिथे ते कमी दर्जाचे राज्य होईल.
१५
ते सर्वात कमी दर्जाचे राज्य असतील आणि कधीही इतर राष्ट्रांच्या वर होणार नाहीत. मी त्याला इतके कमी करेन की ते राष्ट्रांवर पुन्हा राज्य करणार नाही.
१६
इजिप्त यापुढे इस्राएल लोकांसाठी आणखी आधार नसतील परंतु त्यांच्या पापाची आठवण म्हणून ते त्यांच्याकडे मदतीसाठी जातील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options