यहेज्केल २६:१-६
१
बाराव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
२
“मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’
३
यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अगे सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि जशा समुद्राच्या लाटा उसळतात तसे अनेक राष्ट्र मी तुझ्याविरुद्ध आणेन.
४
ते सोरचे तट पाडतील व तिच्या बुरुजांचा विध्वंस करतील; मी तिची माती खरडून काढेन व तिला एक उघडा खडक करेन.
५
ती बाहेर समुद्रावर जाळे पसरण्याचे स्थान होईल, कारण मी हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात. ती राष्ट्रांसाठी लूट होईल,
६
आणि भूप्रदेशात असलेले तिचे लोक तलवारीने पडतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
Settings