Skip to content
यहेज्केल २१:२८

यहेज्केल २१:२८

आजूबाजूच्या संदर्भासह वचन २८ दाखवत आहे.
२५
“ ‘हे इस्राएलाच्या अपवित्र व दुष्ट राजपुत्रा, ज्याचा दिवस आला आहे, ज्याला दंड द्यायचा शेवटचा समय आला आहे,
२६
त्या तुला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझा टोप उतरव, मुकुट काढून टाक. तो जसा होता तसा आता नसेल: जे नम्र ते उंच केले जातील व जे उंच ते नम्र केले जातील.
२७
नाश! नाश! मी याचा नाश करेन! ज्याच्याकडे त्या मुकुटाचा खरा अधिकार आहे तो येईपर्यंत हा मुकुट पुनर्स्थापित होणार नाही; त्यालाच मी तो देईन.’
२८
“आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, कत्तल करण्यास उपसलेली, नाश करण्यास व विजेप्रमाणे; ती चमकविलेली व चमकणारी आहे!
२९
जरी तुमच्याविषयीचे खोटे दृष्टान्त व तुमच्याबद्दलचे लबाड शकुन केले, तरीही ज्या दुष्टांचा नाश झाला पाहिजे म्हणून त्यांच्या मानेवर तलवार ठेवली जाईल, त्यांचा दिवस आला आहे, त्यांना दंड द्यायचा शेवटचा समय येऊन ठेपला आहे.
३०
“ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या. ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली, तुझ्या पूर्वजांच्या भूमीत, मी तुझा न्याय करेन.
३१
मी माझा क्रोध तुझ्यावर ओतेन आणि माझ्या कोपाचा अग्नी तुझ्यावर फुंकेन; क्रूर लोक जे नाश करण्यात निपुण आहेत, त्यांच्या हाती मी तुला सोपवेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options