Skip to content
यहेज्केल २१:२८-३२

यहेज्केल २१:२८-३२

२८
“आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, कत्तल करण्यास उपसलेली, नाश करण्यास व विजेप्रमाणे; ती चमकविलेली व चमकणारी आहे!
२९
जरी तुमच्याविषयीचे खोटे दृष्टान्त व तुमच्याबद्दलचे लबाड शकुन केले, तरीही ज्या दुष्टांचा नाश झाला पाहिजे म्हणून त्यांच्या मानेवर तलवार ठेवली जाईल, त्यांचा दिवस आला आहे, त्यांना दंड द्यायचा शेवटचा समय येऊन ठेपला आहे.
३०
“ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या. ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली, तुझ्या पूर्वजांच्या भूमीत, मी तुझा न्याय करेन.
३१
मी माझा क्रोध तुझ्यावर ओतेन आणि माझ्या कोपाचा अग्नी तुझ्यावर फुंकेन; क्रूर लोक जे नाश करण्यात निपुण आहेत, त्यांच्या हाती मी तुला सोपवेन.
३२
तू अग्नीला इंधन अशी होशील, तुझे रक्त तुझ्याच देशात सांडेल, तुझी आठवण आणखी केली जाणार नाही; कारण मी याहवेह हे बोललो आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options