यहेज्केल २१:१८-२१
१८
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
१९
“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाच्या तलवारीसाठी दोन रस्ते आखून घे, दोन्ही एकाच देशातून निघतील. शहराकडे जाताना जिथे दुहेरी वाटा निघतात तिथे चिन्हस्तंभ लाव.
२०
अम्मोन्यांच्या राब्बाहविरुद्ध येणार्या तलवारीसाठी एक वाट आणि यहूदाह व तटबंदीच्या यरुशलेमच्या विरुद्ध येणार्या तलवारीसाठी दुसरी वाट आखून ठेव.
२१
कारण बाबेलचा राजा शकुन पाहण्यासाठी दुहेरी वाटेच्या मधोमध, त्या दोन वाटांच्या चौकात थांबेल: तो बाणांनी चिठ्ठ्या टाकेल, तो मूर्तींचा सल्ला घेईल आणि काळजाची परीक्षा करून शकुन पाहील.
Settings