यहेज्केल १७:६-१०
६
आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या.
७
“ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या.
८
त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’
९
“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार.
१०
तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ”
Settings