Skip to content
यहेज्केल १६:२३-२९

यहेज्केल १६:२३-२९

२३
“ ‘धिक्कार! तुझा धिक्कार असो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुझ्या इतर दुष्टतेबरोबर,
२४
तू स्वतःसाठी घुमट बांधले आणि प्रत्येक चौकात उच्च पूजास्थान बनविले.
२५
प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला.
२६
मोठ्या लैंगिक अवयवांचे इजिप्तचे लोक तुझे शेजारी, यांच्याशी तू वेश्यावृत्ती केली आणि तुझ्या या वाढत्या व्यभिचाराने तू माझा क्रोध भडकावला.
२७
यामुळे मी माझा हात तुझ्याविरुद्ध पसरविला आणि तुझी सीमा कमी केली; मी तुला तुझ्या वैरिणी, म्हणजेच पलिष्टी स्त्रियांच्या हावेस स्वाधीन केले, ज्यांना तुझ्या या अश्लील वर्तनामुळे धक्का बसला आहे.
२८
तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही.
२९
तेव्हा तू आपली व्यभिचारी प्रवृत्ती वाढवली व बाबिलोन जो व्यापाऱ्यांच्या देशाला सामील केले, परंतु त्यातही तू तृप्त झाली नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options