Skip to content
यहेज्केल १४:१२-२०

यहेज्केल १४:१२-२०

१२
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
१३
“हे मानवपुत्रा, जर एखाद्या देशाने अविश्वासू राहून माझ्याविरुद्ध पाप केले आणि त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यास व त्यावर दुष्काळ आणून त्यातील लोक व जनावरे मारून टाकण्यास त्याविरुद्ध मी माझा हात लांब केला,
१४
जरी नोआह, दानीएल व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१५
“किंवा त्या देशभरात मी जंगली जनावरे पाठवली आणि त्यांनी तो अपत्यहीन केला आणि जंगली जनावरांमुळे कोणीही त्यातून येणे जाणे करीत नाही, त्यामुळे देश ओसाड पडला,
१६
तर सार्वभौम याहवेह घोषित करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते, परंतु देश ओसाड पडला असता.
१७
“किंवा त्या देशाविरुद्ध तलवार आणली आणि म्हटले, ‘तलवार संपूर्ण देशभर चालो,’ आणि त्यातील सर्व लोकांना व जनावरांना मारून टाकले,
१८
सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते.
१९
“किंवा त्या देशावर मी मरी पाठवून त्यातील लोकांना व जनावरांना मारून रक्तपाताने माझा क्रोध त्यावर ओतला,
२०
तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options