Skip to content
यहेज्केल १२:२३-२८

यहेज्केल १२:२३-२८

२३
त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, या म्हणीचा मी शेवट करणार आहे आणि ते इस्राएलमध्ये पुन्हा तिचा उच्चार करणार नाहीत.’ त्यांना सांग, ‘प्रत्येक दृष्टान्ताची पूर्तता होण्याचे दिवस जवळ येत आहेत.
२४
कारण इस्राएल लोकांमध्ये आणखी खोटे दृष्टान्त किंवा खुशामत करणारा जादूटोणा नसेल.
२५
परंतु मी याहवेह, मला जे वाटते ते बोलेन आणि विलंब न करता ते पूर्ण होईल. कारण अहो बंडखोर लोकहो, तुमच्या याच दिवसात, मी जे बोलेन ते पूर्ण करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
२६
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
२७
“मानवपुत्रा, इस्राएलचे लोक म्हणतात, ‘जो दृष्टान्त तो पाहतो तो यापुढील अनेक वर्षांसाठी आहे आणि तो दूरच्या काळाविषयी भविष्यवाणी करतो.’
२८
“म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझा कोणताही शब्द आणखी विलंब करणार नाही; जेव्हा मी ते बोलेन ते पूर्णतेस जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options