Skip to content
निर्गम ३९:१-५

निर्गम ३९:१-५

पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
मग त्यांनी एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा वापर करून बनविला.
त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले.
एफोदासाठी त्यांनी दोन खांदेपट्ट्या बनविल्या, ज्या त्याच्या दोन कोपर्‍यांना बांधता येतील अशा जोडल्या.
कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच होता; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे तो बनविला होता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options