Skip to content
निर्गम ३४:३

निर्गम ३४:३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
मग याहवेह मोशेला म्हणाले, “पहिल्या पाट्यांसारख्याच दोन दगडी पाट्या तू घडव, मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होते ते मी त्यावर लिहेन.
तू सकाळी तयार राहा आणि मग सीनाय पर्वतावर ये. तिथे डोंगरमाथ्यावर माझ्यासमोर स्वतःला सादर कर.
तुझ्याबरोबर कोणीही येऊ नये किंवा डोंगरावर कुठेही इतर कोणी दृष्टीस पडू नये; गुरे आणि शेरडेमेंढरे यांनी सुद्धा डोंगरासमोर चरू नये.”
मग मोशेने पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडवून घेतल्या आणि त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोठ्या पहाटे सीनाय पर्वतावर गेला.
मग याहवेह ढगामध्ये खाली उतरले आणि तिथे मोशेसमोर उभे राहिले. तिथे त्यांनी याहवेह या आपल्या नावाची घोषणा केली.
आणि याहवेह मोशे समोरून जाताना घोषणा केली, “याहवेह, याहवेह, दयाळू व कृपाळू परमेश्वर, मंदक्रोध, प्रीती व विश्वासूपण यात उदंड,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options