परमेश्वर आपले नाव घोषित करतो
निर्गम ३४:५-९
५
मग याहवेह ढगामध्ये खाली उतरले आणि तिथे मोशेसमोर उभे राहिले. तिथे त्यांनी याहवेह या आपल्या नावाची घोषणा केली.
६
आणि याहवेह मोशे समोरून जाताना घोषणा केली, “याहवेह, याहवेह, दयाळू व कृपाळू परमेश्वर, मंदक्रोध, प्रीती व विश्वासूपण यात उदंड,
७
हजारांवर प्रीती करणारे, दुष्टता, अपराध व पाप यांची क्षमा करणारे; तरीही याहवेह दोषीला निर्दोष असे सोडत नाहीत; तर आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततीवर, व त्यांच्या संततीच्या तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत देणारे आहे.”
८
तेव्हा मोशेने भूमीस लवून उपासना केली.
९
तो म्हणाला, “हे प्रभू, तुमच्या दृष्टीने मी जर कृपा पावलो असलो, तर प्रभूने आमच्याबरोबर जावे. जरी हे लोक ताठ मानेचे आहेत, तरी आमच्या दुष्टाईची व आमच्या पापाची क्षमा करून आपले वतन म्हणून आमचा स्वीकार करा.”
Settings