Skip to content
निर्गम ३४:१८-२३

निर्गम ३४:१८-२३

१८
“बेखमीर भाकरीचा सण पाळा. मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अबीब महिन्यात नेमीत वेळी ते करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघाला होता.
१९
“प्रत्येक उदरातील प्रथम जन्मलेला, तुमच्या गुरातील सर्व प्रथम जन्मलेले नर, मग ते खिल्लारातील असो किंवा मेंढरांतील असो माझे आहेत.
२०
गाढवाचे प्रथमवत्स कोकरू देऊन खंडणी भरून सोडवून घ्यावा, परंतु तो जर तुम्ही खंडणी भरून सोडविला नाही तर, त्याची मान मोडावी. तुमच्या सर्व प्रथम पुत्रांना खंडणी भरून सोडवावे. “कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाताने येऊ नये.
२१
“सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्यावा; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात सुद्धा तुम्ही विसावा घ्यावा.
२२
“गव्हाच्या कापणीच्या वेळी प्रथम पिकाने सप्ताहाचा उत्सव साजरा करावा आणि वर्षाच्या शेवटी हंगामाचा सण पाळावा.
२३
वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह, इस्राएलचे परमेश्वर यांच्यासमोर हजर व्हावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options