Skip to content
निर्गम २९:१०-१४

निर्गम २९:१०-१४

१०
“मग सभामंडपाच्या समोर गोर्‍हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत.
११
सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्‍हा वधावा.
१२
गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
१३
मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ आणि त्यांच्या चरबीसह दोन्ही गुरदे घेऊन ती वेदीवर जाळावी.
१४
परंतु गोर्‍ह्याचे मांस व त्याची विष्ठा व त्याची आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकाव्या. ते पापार्पण आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options