Skip to content
निर्गम २५:२९-३९

निर्गम २५:२९-३९

२९
आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील ताटे, पात्रे, तसेच त्याचे कलश व वाट्या हे शुद्ध सोन्याचे असावे.
३०
त्या मेजावर माझ्यासमोर समक्षतेची भाकर नेहमी ठेवलेली असावी.
३१
“शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत.
३२
दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाव्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला.
३३
एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.
३४
आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले त्याच्या कळ्या व फुले बनवावे.
३५
दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी असावी, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस, आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली असावी; सर्व मिळून सहा फांद्या असाव्या.
३६
या सर्व कळ्या व फांद्या शुद्ध सोन्याच्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून असाव्या.
३७
“मग त्याचे सात दिवे तयार करून ते दीपस्तंभावर असे ठेवावे की त्यांचा प्रकाश त्यांच्यासमोर पडेल.
३८
त्यांच्या वातीचे चिमटे व ते ठेवण्याची तबके शुद्ध सोन्याची असावी.
३९
दीपस्तंभ व इतर उपकरणांसाठी एक तालांत शुद्ध सोन्याचा उपयोग करावा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options