Skip to content
निर्गम २१:१२-२१

प्राणदंडाच्या अपराधांचे नियम

निर्गम २१:१२-२१
१२
“जर कोणी एखाद्यावर प्राणघातक हल्ला केला तर त्याला मृत्युदंड द्यावा.
१३
जरी ते मुद्दाम केलेले नाही, पण परमेश्वरानेच ते घडवून आणले, तर मी नेमलेल्या ठिकाणी त्यांनी पळून जावे.
१४
पण कोणी जर कपटाने एखाद्याचा वध केला, तर त्याला माझ्या वेदीकडे नेऊन मृत्युदंड द्यावा.
१५
“जे कोणी आपला पिता किंवा आईला जिवे मारतात त्यांना जिवे मारावे.
१६
“जो कोणी एखाद्याचे अपहरण करतो त्याला जिवे मारावे, पीडित व्यक्ती त्याच्या ताब्यात असो किंवा कोणाला विकलेली असो.
१७
“जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.
१८
“जर लोक आपसात भांडत असताना एकाने दुसर्‍याला दगडाने किंवा बुक्कीने मारले आणि पीडित व्यक्ती मेली नाही, परंतु आपले अंथरूण धरून राहिली,
१९
आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा.
२०
“जो कोणी आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाला काठीने मारेल व त्यामुळे गुलाम मरण पावला, तर त्या धन्याला शिक्षा व्हावी.
२१
पण जर गुलाम एक किंवा दोन दिवसात बरा झाला तर त्यांना पैशाची शिक्षा होणार नाही, कारण गुलाम त्यांच्या मालकीचा आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options