एस्तेर ९:१२-१६
१२
तेव्हा त्याने एस्तेर राणीला बोलाविले व तो म्हणाला, “शूशन राजधानीतच यहूद्यांनी पाचशे लोक ठार केले आहेत आणि हामानाच्या दहा पुत्रांचाही संहार केला आहे. तर राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल? आता तुझी काय मागणी आहे? ते तुला दिले जाईल. तुझी काय विनंती आहे? ते देखील करण्यात येईल.”
१३
तेव्हा एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस येत असेल तर, येथे शूशन शहरातील यहूद्यांना उद्याही राजाज्ञेप्रमाणे करण्याची परवानगी द्यावी आणि हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर टांगण्यात यावी.”
१४
तेव्हा राजाने हे सर्व करण्याची आज्ञा दिली. फर्मान शूशन शहरात प्रसिद्ध करण्यात आले व हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर लटकविण्यात आली.
१५
मग अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशन शहरातील यहूदी एकत्र गोळा झाले व त्यांनी शूशन शहरात आणखी तीनशे पुरुष ठार केले. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही.
१६
इकडे राजाच्या सर्व प्रांतातील इतर यहूदी लोक स्वतःच्या संरक्षणार्थ एकवटले आणि त्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा संहार केला. त्यांनी पंचाहत्तर हजार लोकांचा वध केला. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही.
Settings