Skip to content
एस्तेर ८:९-१३

एस्तेर ८:९-१३

तेव्हा ताबडतोब राजाच्या चिटणीसांना बोलाविण्यात आले—तो तिसऱ्या, म्हणजे सिवान महिन्याचा, तेविसावा दिवस होता. त्यांनी मर्दखयाने भारतापासून कूशपर्यंतच्या 127 प्रांतातील यहूद्यांना, प्रांतप्रमुखांना, राज्यपालांना, व प्रतिष्ठितांना पाठविण्यासाठी फर्मान लिहून घेतले. राज्यातील विविध लोकांच्या विविध भाषांमधून व लिप्यांमधून, तसेच यहूद्यास त्यांच्या भाषेत व लिपीत ते फर्मान लिहिण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्र लिहून, ते बंद करून त्यावर राजाच्या मुद्रेची मोहोर लावली. मग ती पत्रे राजाच्या निरोपासाठी वापरले जाणारे खास वाढविलेले वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठविली.
११
या फर्मानाद्वारे सर्व नगरात राहत असलेल्या यहूद्यांना आपल्या प्राणाच्या व कुटुंबाच्या रक्षणार्थ एकजूट होण्याची व त्यांचा नाश, कत्तल व नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या, कोणत्याही राज्याच्या व प्रांताच्या सशस्त्र लोकांना, त्यांच्या स्त्रिया व लेकरांना नष्ट करून त्यांची घरेदारे घेण्याची परवानगी देण्यात आली.
१२
हे सर्व करण्यासाठी अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांसाठी एक दिवस म्हणजे बारावा म्हणजे अदार महिन्याचा तेरावा दिवस निवडण्यात आला.
१३
त्या पत्राच्या प्रतिद्वारे प्रत्येक प्रांतातील सर्व जातीच्या नागरिकांना कळविण्यात आले, हे फर्मान सर्वत्र कायदा म्हणून मान्य करण्यात यावे की आपल्या शत्रूचा सूड घेण्यासाठी या दिवशी यहूदी लोक सज्ज राहतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options