मर्दखयाचा सन्मान; शूशनमध्ये आनंद
१५
जेव्हा मर्दखया राजाच्या उपस्थितीतून बाहेर गेला, तेव्हा त्याने निळ्या व पांढर्या रंगांची राजकीय वस्त्रे परिधान केले होते व डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून आणि व जांभळ्या रंगाचा व तलम वस्त्राचा झगा घातला होता. आणि शूशन शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
१६
यहूद्यांकरिता हा समय उल्लास व आनंद, हर्ष व सन्मान साजरा करण्याचा होता.
१७
राजाचे फर्मान ज्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक प्रांतात जाऊन पोहोचले तेव्हा तेथील सर्व यहूद्यांनी मेजवान्या देऊन उत्सव साजरा करून आपला हर्ष व उल्हास प्रकट केला. इतर देशातील अनेक लोक यहूदी बनले, कारण यहूदी आपला जबरदस्तीने ताबा घेतील अशी त्यांना भीती वाटली.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.