मुख्य मजकुरावर जा
एस्तेर ७:३-६

एस्तेर हामानवर आरोप करते

एस्तेर ७:३-६
तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे.
कारण मी व माझे लोक, आमचा नाश, कत्तल व नामशेष करणार्‍यांना विकले गेलो आहोत. स्त्री व पुरुषांची केवळ गुलाम म्हणून विक्री झाली असती, तर कदाचित मी गप्प राहिले असते. त्यामुळे राजास कष्ट देण्याची गरज पडली नसती.”
तेव्हा अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “तो कोण आहे? कुठे आहे तो—जो असे काही करण्याचे धाडस करेल?”
त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options