एस्तेर ७:१-३
१
मग राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीला गेले.
२
दुसऱ्या दिवशी ते मद्य पीत असताना, राजाने परत एस्तेरला विचारले, “एस्तेर राणी, तुझी विनंती काय आहे? ती तुला देण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याची असली तरी, पूर्ण करण्यात येईल.”
३
तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे.
Settings