Skip to content
एस्तेर २:१९-२२

एस्तेर २:१९-२२

१९
त्यानंतर जेव्हा सर्व कुमारिका पुन्हा एकत्र आणल्या गेल्या, मर्दखय राजमहालाच्या व्दारात बसला होता.
२०
एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती मर्दखयाच्या सूचनेनुसार कोणालाही सांगितली नव्हती. कारण मर्दखयाच्या घरी असताना ती ज्याप्रमाणे आज्ञा पाळीत असे, त्याचप्रमाणे ती अद्यापही त्याच्या आज्ञा पाळीत होती.
२१
एके दिवशी मर्दखय राजवाड्याच्या द्वारात बसलेला असताना, राजाचे दोन अधिकारी बिग्थान व तेरेश, जे राजवाड्याच्या द्वारी द्वारपाल होते, ते राजावर संतापले आणि अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा त्यांनी कट केला.
२२
मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options