मुख्य मजकुरावर जा
एस्तेर २:१२-१६

शुद्धीकरणाचे वर्ष

एस्तेर २:१२-१६
१२
अहश्वेरोश राजाच्या शयनमंदिरात नेण्यापुर्वी प्रत्येकीवर बारा महिने सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करण्यात येत, सहा महिने गंधरसाच्या तेलाचा उपचार व सहा महिने खास सुवासिक द्रव्ये व प्रसाधनांचा उपचार केला जाई.
१३
मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती.
१४
तिला संध्याकाळी नेण्यात येई आणि दुसर्‍या दिवशी सकाळी राजाच्या उपपत्नी राहत, त्या अंतःपुराच्या दुसर्‍या भागात ती जाई. तिथे ती राजाच्या खोजांपैकी शाशगज नावाच्या खोजाच्या देखरेखीखाली असे. राजाने तिचे नाव घेऊन तिला परत बोलाविले नाही, तर राजाकडे तिला पुन्हा पाठविले जात नसे.
१५
राजाकडे जाण्याची एस्तेरची (मर्दखयाने दत्तक घेतलेली, त्याचे काका अबीहाईलच्या कन्याची) पाळी आली, तेव्हा तिने अंतःपुराचा प्रमुख हेगाइचा सल्ला स्वीकारून त्याच्या सूचनेप्रमाणे वस्त्रे परिधान केली आणि ज्यांनीही तिला पाहिले, त्यांची कृपादृष्टी तिच्यावर झाली.
१६
तेव्हा एस्तेरला अहश्वेरोश राजाच्या महालात त्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या दहाव्या म्हणजे, तेबेथ महिन्यात नेण्यात आले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options