मुख्य मजकुरावर जा
उपदेशक ८:१-८

अधिकाराला अधीनता व ज्ञान

उपदेशक ८:१-८
सुज्ञासारखा कोण आहे? गोष्टींचे स्पष्टीकरण कोणाला माहीत आहे? मनुष्यांचे सुज्ञान त्यांचे मुख उजळून टाकते आणि त्यांचे कठोर स्वरूप बदलते.
मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे.
राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो.
कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार?
त्याच्या आज्ञांचे पालन करणार्‍यांना इजा होणार नाही, आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल.
जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात, तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते.
जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते, तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार?
जसे कोणत्या मनुष्याला वार्‍यावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य नाही, तसेच त्यांच्या मृत्यूच्या वेळेवरही कोणाला अधिकार नाही. जसे कोणालाही युद्धाच्या वेळी सुट्टी नसते, तसेच दुष्टता करणाऱ्यांना ती त्यातून सुटका देत नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options