मुख्य मजकुरावर जा
उपदेशक ७:२३-२६

ज्ञानाचे गूढ स्वरूप

उपदेशक ७:२३-२६
२३
सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले, “मी सुज्ञानी होण्याचे ठरविले आहे”— परंतु हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होते.
२४
जे काही अस्तित्वात आहे ते खूपच दूर आणि सखोल आहे, त्याचा शोध कोणाला घेता येईल?
२५
ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी आणि दुष्टतेची मूर्खता व मूर्खतेचा वेडेपणा समजण्यासाठी मी माझे मन वळविले.
२६
मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की, एक स्त्री जी एक पाश आहे, जिचे हृदय एक सापळा आहे जिचे हात साखळीप्रमाणे आहेत. जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील, परंतु पापींना ती पाशात अडकवेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options