उपदेशक १२:२-६
२
जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत;
३
जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, आणि बलवान पुरुष वाकून जातील, दळण करणार्या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, आणि खिडक्यांमधून पाहणार्यांची नजर अंधुक होईल;
४
जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील आणि जात्याचा आवाज मंद होईल; जेव्हा लोक पक्ष्यांच्या आवाजाने उठतील, परंतु त्यांची सर्व गीते शांत होतील;
५
जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते; जेव्हा बदामाची झाडे फुलतात आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही. तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात आणि शोक करणारे रस्त्यावर येतात.
६
आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,
Settings