अनुवाद ७:२-६
२
आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल, तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ नायनाट करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका किंवा त्यांना दया दाखवू नका.
३
तुम्ही त्यांच्याशी आंतरविवाह करू नका, तुमच्या कन्या त्यांच्या पुत्रांसाठी देऊ नका किंवा त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांसाठी घेऊ नका,
४
कारण ते तुमच्या मुलांना माझे अनुसरण करण्यापासून परावृत्त करून इतर दैवतांची उपासना करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते लगेच तुमचा नाश करतील.
५
तुम्ही त्यांच्या बाबतीत हे करा: त्यांच्या वेद्या मोडून टाका, त्यांच्या पवित्र पाषाणांचा चुरा करा, त्यांचे अशेराचे स्तंभ तोडून टाका आणि त्यांच्या मूर्ती अग्नीत जाळून टाका.
६
कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. संपूर्ण पृथ्वीवरील सर्व लोकातून याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला अशासाठी निवडले आहे की, तुम्ही त्यांचा खूप मोलाचा ठेवा असावा.
Settings