अनुवाद ६:४-९
४
हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत.
५
याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.
६
या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या.
७
त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.
८
त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा.
९
त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहा.
Settings