Sari la conținut
अनुवाद ६:१०-१६

अनुवाद ६:१०-१६

१०
जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील,
११
तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल,
१२
ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.
१३
तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी.
१४
इतर दैवतांच्या, तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या दैवतांच्या मागे लागू नका;
१५
कारण याहवेह तुमचे परमेश्वर, जे तुम्हामध्ये आहेत, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत, यामुळे त्यांचा राग भडकेल व ते तुम्हाला या पृथ्वीवरून नष्ट करून टाकतील.
१६
मस्सा येथे पाहिली तशी तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options