अनुवाद ५:६-१०
६
“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
७
“माझ्यासमोर तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.
८
तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.
९
तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो,
१०
परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.
Settings