२२
तेव्हा त्याच दिवशी मोशेने त्या गीताचे शब्द लिहून काढले आणि सर्व इस्राएली लोकांना ते शिकविले.
२३
नंतर याहवेहने नूनाचा पुत्र यहोशुआला ही आज्ञा दिली: “खंबीर हो व हिंमत धर, कारण तू सर्व इस्राएली लोकांना मी त्यांना देऊ केलेल्या वचनदत्त देशात आणशील आणि मी स्वतः तुझ्याबरोबर असेन.”