Skip to content
अनुवाद ३१:१९-२२

अनुवाद ३१:१९-२२

१९
“म्हणून आता हे गीत तुम्ही लिहून घ्या आणि ते इस्राएलाच्या सर्व लोकांना शिकव व त्यांना गावयास सांग, म्हणजे हे गीत त्यांच्याविरुद्ध माझ्याकरिता साक्ष असेल.
२०
जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथ वाहून देऊ केला आहे, त्या दुधामधाचा प्रवाह वाहणार्‍या देशात, मी त्यांना आणेन आणि ते खाऊन पिऊन तृप्त व संपन्न होतील, तेव्हा ते इतर दैवतांकडे वळतील आणि त्यांची उपासना करू लागतील, माझी उपेक्षा करतील आणि माझा करार मोडतील.
२१
आणि जेव्हा त्यांच्यावर अनेक संकटे व अरिष्टे येतील, तेव्हा हे गीत त्यांच्याविरुद्ध साक्ष असे ठरेल, कारण त्यांचे वंशज हे गीत विसरू शकणार नाही. या वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वीच या लोकांची प्रवृत्ती कशी आहे हे मला माहीत आहे.”
२२
तेव्हा त्याच दिवशी मोशेने त्या गीताचे शब्द लिहून काढले आणि सर्व इस्राएली लोकांना ते शिकविले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options