मुख्य मजकुरावर जा
अनुवाद २९:१०-१५

सर्व इस्राएल करारात प्रवेश करतो

अनुवाद २९:१०-१५
१०
आज तुम्ही सर्वजण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या उपस्थितीत उभे आहात—म्हणजे तुमचे पुढारी व तुमचे गोत्र, तुमचे वडील आणि अधिकारी आणि इस्राएलमधील इतर सर्व पुरुष,
११
तुमचे लेकरे आणि तुमच्या स्त्रिया व मुलेबाळे आणि तुमच्या छावणीमध्ये राहणारे परदेशी, जे तुमच्यासाठी लाकूड तोडतात आणि तुमच्यासाठी पाणी भरतात.
१२
याहवेह तुमच्या परमेश्वराशी करार करण्यासाठी येथे तुम्ही उभे आहात, तो करार याहवेह आज तुमच्यासोबत करीत आहेत आणि शपथपूर्वक त्यावर अशी मोहोर लावत आहेत की,
१३
तुम्ही त्यांचे लोक आहात आणि तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रतिज्ञापूर्वक वचन दिल्याप्रमाणे याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत याची आज तुम्हाला खात्री करून द्यावयाची आहे.
१४
हा करार मी शपथपूर्वक करीत आहे, केवळ तुमच्याशीच नव्हे,
१५
तर आज याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर जे इस्राएली उभे आहेत व जे आज येथे नाहीत त्यांच्यासोबत देखील ते आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options