Skip to content
अनुवाद २९:१-९

अनुवाद २९:१-९

याहवेहने मोआब देशात इस्राएली लोकांबरोबर जो करार करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्याच्या या अटी आहेत, त्यांनी होरेब पर्वतावर जो करार केला होता तो विस्तारित असा आहे.
मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि सांगितले: इजिप्त देशात फारोह, त्याच्या अधिकार्‍यांशी आणि त्याच्या देशात याहवेहने जे काही केले ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
तिथे ज्या महान पीडा आणि ते चिन्ह आणि जे महान चमत्कार केले, ते सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत.
पण याहवेहने आजपर्यंत तुम्हाला समजणारी अंतःकरणे किंवा पाहू शकणारे डोळे किंवा ऐकू शकणारे कान दिलेले नाहीत.
तरी देखील याहवेह म्हणतात, “चाळीस वर्षे तुम्हाला त्या रानात चालविले, तरी तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत ना तुमची पायतणे झिजली.
खाण्यासाठी तुमच्याजवळ भाकर नव्हती अथवा पिण्यासाठी तुमच्याजवळ द्राक्षारस किंवा मद्य नव्हते. हे मी यासाठी केले की मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, हे तुम्ही ओळखावे.”
जेव्हा तुम्ही येथे आला, तेव्हा हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओग लढाई करण्यासाठी आपल्यावर चालून आले, पण आपण त्यांचा पराभव केला.
त्यांचा प्रदेश जिंकून आपण तो रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला वतन म्हणून दिला.
म्हणून या कराराच्या अटींचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही जे सर्वकाही कराल त्यात तुम्ही समृद्ध व्हाल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options