Skip to content
अनुवाद २८:५८-६५

अनुवाद २८:५८-६५

५८
या पुस्तकात नमूद केलेली नियमशास्त्राची वचने तुम्ही प्रामाणिकपणे आचरणात आणली नाही आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या अद्भुत आणि भयावह नावाचा मान तुम्ही राखला नाही,
५९
तर याहवेह तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर असाध्य रोग आणि कधीही न थांबणारे भयंकर साथीचे रोग पाठवतील.
६०
ज्या रोगांना तुम्ही भिता, असे इजिप्तमधील सर्व रोग तुमच्यावर आणतील आणि ती तुम्हाला लागून राहतील.
६१
तुमचा नाश होईपर्यंत याहवेह तुम्हावर प्रत्येक आजार आणि सर्व साथींचे रोग आणि या नियमशास्त्र ग्रंथात ज्यांचा उल्लेख नाही, असे सर्व रोग तुम्हावर आणतील.
६२
तुम्ही आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित असला, तरी अगदीच थोडके उराल, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आज्ञापालन केले नाही.
६३
तुमची भरभराट करण्यात व तुम्हाला बहुगुणित करण्यात जसा याहवेहला आनंद वाटला, तसाच आनंद त्यांना तुमचा नाश व नायनाट करण्यातही वाटेल. जो देश तुम्ही ताब्यात घेण्यास जात आहात, त्या देशातून तुमचे उच्चाटन करण्यात येईल.
६४
पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.
६५
त्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला स्वास्थ्य मिळणार नाही, तुमच्या पायांना विसावा मिळणार नाही, तिथे तुमची हृदये थरथर कापत राहतील, तुमचे डोळे म्लान होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल, असे याहवेह करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options