Skip to content
अनुवाद २२:५-१२

अनुवाद २२:५-१२

कोणत्याही स्त्रीने पुरुषाचा पोशाख घालू नये किंवा कोणत्याही पुरुषाने स्त्रीचा पोशाख घालू नये, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने असे करणे घृणित आहे.
जर तुम्हाला मार्गाच्या कडेला किंवा झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि त्यात मादी पिलांवर किंवा अंड्यांवर बसलेली असेल, तर त्या मादीला पिलांसोबत धरू नये.
तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.
जेव्हा तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा धाब्याला कठडा बांधवा, म्हणजे कोणीही धाब्यावरून पडल्यास मनुष्य हत्येचा दोष तुमच्या घरावर येऊ नये.
तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील.
१०
एकाच नांगराला बैल व गाढव यांना एकत्र जुंपून नांगरणी करू नये.
११
लोकर व ताग यांचे मिश्रण असलेली वस्त्रे घालू नका.
१२
आपल्या अंगरख्याच्या चारही कोपर्‍यांना गोंडे लावावीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options